top of page
Writer's pictureMr. Gajanan Vaidya, India

सेरेब्रल पाल्सी (प्रमस्तिष्क पक्षाघात ) - 1

सेरेब्रल पाल्सी (सीपी) हे भारतातल्या लहानग्यांमध्ये दिव्यांगत्वाचे मुख्य कारण आहे. दरवर्षी जन्माला येणाऱ्या एक हजार मुलांपैकी तीन जणांना सेरेब्रल पाल्सी असतो. त्यामुळे सेरेब्रल पाल्सी म्हणजे नेमके काय हे जाणून घेणे पालक / शिक्षकांनसाठी महत्वाचे आहे...

सेरेब्रल पाल्सी या शब्दाची फोड सेरेब्रल म्हणजे मेंदूशी संबंधित आणि पाल्सी म्हणजे अर्धांगवायू अशी होते. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्नायूंच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाऱ्या हानीमुळे होतात. सेरेब्रल पाल्सी ही अवस्था आहे. परिपक्व मेदुला झालेल्या आघातामुळे चलनवलन यंत्रणेत बिघाड होतो व त्याचबरोबर शारीरिक संतुलनात ही उणीवा येतात . ह्या दोघांसोबत निरनिराळ्या उणीवा दिसू शकतात. उदा . कर्णबधिरता , दृष्टीदोष , वाचा व संभाषणाचा दोष , मतिमंदत्व, स्वमग्नता व विशेष शैक्षणिक अक्षमता. सेरेब्रल पाल्सीच्या काही मुलांना अपस्माराची (epilepsy) असू शकते . ही अवस्था अनुवांशिक नाही, हा रोग /संसर्गजन्य नाही. त्याचे स्वरूप वाढीव नाही. ह्याचा औषधी उपचार नाही. परंतु लहान वयात ह्या अवस्थेची ओळख होणे व त्यावर शीघ्र हस्तक्षेप करून योग्य मार्गदर्शन मिळणे फारच मोलाचे ठरते .

सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. सेरेब्रल पाल्सी होण्याची काही कारणे अशी आहेत प्रसुती दरम्यान आईला झालेला संसर्ग, काही औषधांचे सेवन, गंभीर जखमा ही प्राथमिक कारणे असू शकतात. त्याचबरोबर मुदतीआधी जन्मलेले अपत्य, जन्माच्यावेळी अपत्याचे वजन कमी असणे, मूल उशिरा रडणे, जन्मताना झालेल्या जखमा, एकावेळी अनेक मुलांचा जन्मही सेरेब्रल पाल्सीची

कारणे असू शकतात. प्राणवायूची कमतरता, कावीळ, सीझर किंवा मेंदूत पाणी जमा होणे यामुळेही सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो.


सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही.सेरेब्रल पाल्सी च्या मुलांमध्ये शारीरिक व्यंग असते . परंतु व्यंगाचे प्रमाण वेगवेगळे असते. सर्व सेरेब्रल पाल्सी ची मुले एकसारखी नसतात. काही स्वतंत्ररीत्या सर्व काही करू शकतात. तर काही दैनदिन जीवन कौशल्यांसाठीसुद्धा दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यांना हिंडायला, फिरायला कुबडी / खुर्चीची गरज भासू शकते. काही मुले बारीक सारीक कामे (बटन लावणे, मणी ओवणे इ .) करून घेतात, तर काही मुले ढोबळ कामांसाठी आपले हात वापरू शकत नाही (पेला धरणे, हात उघडणे, जेवणे इ .)

सेरेब्रल पाल्सी चे वर्गीकरण व त्याचे प्रकार , त्याची माहिती लेखाच्या पुढील भागात घेऊया...

7 views0 comments

Comentarios


bottom of page