यः *पठति लिखति पश्यति* परिपृच्छति पंडितान् उपाश्रयति l तस्य दिवाकरकिरणैः नलिनी दलं इव विस्तारिता बुध्दिः ll
विद्यार्थी मित्रांनो श्लोकमधील अधोरेखित शब्दांचा निश्चित अर्थ काय ते खालील चित्रावरुन आपल्याला स्पष्ट होतोय. 'ति' प्रत्यय असलेले पठति , लिखति , पश्यति , हे अधोरेखित शब्द संस्कृतभाषेतील क्रियापद आहेत , हे धातु या शब्दाने संबोधले जाणारे क्रियेचे रुप दर्शवितात. जसे - पठति मध्ये - पठ् , लिखति मध्ये - लिख् , पश्यति मध्ये - दृश् - पश्य् ही धातु रुपे आहेत. या धातुरुपाला योग्यकाळातील प्रत्यय लावून ते संस्कृतभाषेत ' क्रियापद' म्हणून उपयोगात आणतात.
चित्र बघतांना त्यातील कर्ता कुठली क्रिया करतोय हे कळत. संस्कृतभाषेत काळानुरुप ( उदाहरणार्थ - वर्तमानकाळ ,भूतकाळ , आज्ञार्थ , भविष्यकाळ ) धातुंना वेगवेगळे प्रत्यय लागतात. त्यानंतर त्यांचे त्या विशिष्ट काळातील क्रियापदाचे रुप तयार होते.
जसे वर्तमानकाळाचे एक सार्वत्रिक सत्य आहे की , तो घडत असलेली ( चालु क्रिया ) क्रिया दर्शवितो. या वर्तमानकाळातील प्रत्ययांना संस्कृतमध्ये 'लट् लकार ' प्रत्यय म्हणतात. ती आत्मनेपद व परस्मैपद अशा दोन स्वरूपात वापरली जातात. ज्या विशिष्ट पदाचा ( परस्मैपद /आत्मनेपद ) तो धातु असतो. त्या पदातील प्रत्यय त्या धातुंना लागतात.
चित्रातील कर्ता काय क्रिया करतोय ? हे जसे समजते. तसेच वाक्य एकवचनात आहेत ? द्विवचनात आहेत ? की , बहुचनात आहेत ? हे देखील समजणे गरजेचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना परस्मैपदाचे लट् प्रत्यय म्हणजेच , वर्तमानकाळाचे पुढील प्रत्यय माहिती असावेत .
पुढील प्रत्यय बघा ...
वर्तमानकाळ - लट् प्रत्यय l
एकवचन - द्विवचन - बहुवचन - पुरुषः
ति तः अन्ति - प्रथमः पुरुषः
या प्रत्ययांच्या स्थानानुसार वाक्य कुठल्या वचनात चाललेले आहे हे समजत, व वाक्यनिर्माण प्रक्रियेतील कर्ता व क्रियापद या अनुषंगाने मांडणी करून प्रथम पुरुष एकवचनाची काही वाक्ये पुढीलप्रमाणे तयार होतील.
१) रामः पिबति l
२) सः गायति l
३) राधिका लिखति l
४) एषः खादति l
५) बालकः श्रुणोति l
६) गजः चलति l
७) महिला सिञ्चति l
८) वृध्दः गच्छति l
९) गणेशः पश्यति l
१0) राघवः पठति l
वरील वाक्यात वर्तमानकाळातील कर्ता प्रथमा विभक्तीत व त्यानुसार योग्य असे क्रियापद वापरून वाक्ये तयार केलेली दिसतात. लट् लकार प्रथम पुरुष व्याकरण घटकाला या पध्दतीने व्यवस्थित समजून इतर धातुंची वर्तमानकाळातील वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करावा.
पुढील भागात नव्या लकाराला अभ्यासु या .....
Comments