top of page
Writer's pictureMr. Sunil More, India

कलाकृतीचे नाव :- आईसक्रिम बाउल / बहुपयोगी पात्र

लागणारे साहित्य :- नारळाच्या करवंट्या ( एक गोलाकार व इतर 2 जश्या असतील तशा पसरट आकाराच्या करवंट्या ) व्हाईट पेन्सिल किंवा खडू, करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड), हार्ड पॉलिश पेपर 80 नंबर, सॉफ्ट पॉलिश पेपर 120 नंबर, एम-सिल, फेविक्विक, अक्रेलीक रंग किंवा तैल रंग, पेंटिंग राउंडब्रश नंबर 5,बांगडी.


कृती :- प्रथम आपल्याकडे उपलब्ध असलेल्या करवंट्यापैकी आकाराने गोलाकार आणि आतून काहीशी खोल अशी करवंटी घ्या.तिचे निरीक्षण करा.तिच्यापासून आपण आईसस्क्रीम बाऊल किंवा बहुपयोगी पात्र तयार करणार आहोत.करवंटीचा आकार तंतोतंत गोलाकार दिसण्यासाठी तिच्या ओबडधोबड कमीजास्त असणाऱ्या कडांवर खडू किंवा व्हाईट पेन्सिलने प्रमाणशीर रेखांकन करा.रेखांकन केलेल्या रेषेवर करवत पट्टीने जास्तीचा नको असलेला भाग व्यवस्थित कापून घ्या.आता करवंटी प्रमाणात झालेली म्हणजे तिच्या सर्व कडा प्रमाणात गोलाकार झालेल्या दिसून येतील .त्यानंतर हार्ड पॉलिश पेपरचा हाताच्या तीन बोटांमध्ये मावेल एवढा तुकडा घेऊन त्याने करवंटी वरून खाली या दिशेने घासून घ्या तसेच करवंटीच्या कडा देखील घासून घ्या.थोड्या श्रमानंतर करवंटीवरील तंतुमय भाग आणि खडबडीत आवरण थोडे गुळगुळीत झालेले दिसेल नंतर पुन्हा एकवार करवंटी घासत जाऊन तिच्यावरील बहुतांश खरखरीत भाग निघून गेल्याचे दिसेल आता सॉफ्ट पॉलिश पेपर ने देखील करवंटी बाहेरून आणि आतून देखील घासून घ्या.यानंतर आपल्याकडील असणाऱ्या इतर करवंट्या घ्या त्यांचे निरीक्षण करा.आपल्याला घासून गुळगुळीत झालेल्या गोलाकार करवंटीच्या खाली म्हणजे पृष्ठभागावर बाउल उभे राहिल असा आधार(बेस) म्हणून करवंटी लागणार आहे.उपलब्ध करवंटीमधून एक पसरट आकाराची करवंटी घ्या तिच्यावर घरातील ग्लास, किंवा बांगडी घेऊन खडू किंवा व्हाईट पेन्सिलने वर्तुळाकार रेखाटन करा आणि ती करवंटी करवत पट्टीच्या साह्याने रेखांकन केल्याप्रमाणे वर्तुळाकार आकारात कापून घ्या.तीदेखील हार्ड आणि सॉफ्ट पॉलिश पेपरने घासून गुळगुळीत करा.आता आपल्याकडे करवंटीच्या रुपात एक गोलाकार भांडे आणि तिचा आधार (बेस) इत्यादी तयार आहे.यापैकी गोलाकार व आतून खोल अशी जी करवंटी आहे ते पात्र म्हणून आणि पसरट वर्तुळाकृती करवंटी म्हणजे तिचा आधार (बेस) असे समजा.आता पात्राच्या खाली पृष्ठभागावर वर्तुळाकार पसरट करवंटीला जोडून घ्यायचे आहे.अशा प्रकारे त्यांची मांडणी करून वरच्या करवंटीच्या बरोबर मध्यस्थानी पसरट वर्तुळाकार कापलेल्या करवंटीला आधी फेवीक्विकचे एक-दोन थेंब टाकून वरच्या करवंटीशी जोडा आणि त्यानंतर एम-सिल चे दोन्ही भाग आपल्या आवश्यकतेनुसार एकजीव करा आणि ते मिश्रण जोड दिलेल्या ठिकाणी व्यवस्थित भरा.जोड दिल्यावर 10 मिनिटे सुकू द्या आणि नंतर आपल्याला हव्या त्या तैल रंग किंवा अक्रेलीक रंगाने पात्र रंगवा त्यावर आकर्षकता अधिक वाढावी म्हणून वाटल्यास सुबक अशी पाने-फुले किंवा इतर नक्षी रेखाटन करा आणि रंग सुकू द्या.

3 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page