जाणून घेऊया दृष्टिदोष याबद्दल मागील लेखात आपण दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी वाचन सुलभ करण्यसाठी आपण काय करू शकतो ? हे बघितलेली आहे . आता आपण दृष्टीदोष असणाऱ्या बालकांचे मूल्यमापन कसे करायचे याची माहिती या लेखात जाणून घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊया दृष्टिदोष !
विशेष गरजा असणार्या ( दिव्यांग ) विद्यार्थ्याना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनामध्ये गरजेनुसार अध्ययनार्थी दृष्टीकोनातून अध्ययनशैलीनूसार अध्यापन व अनुकूलित मूल्यांकन पद्धतीचा उपयोग करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 ऑक्टोबर ,2018 रोजीचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . त्यानुसार इयत्ता पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या विशेष शैक्षणिक गरजा असणार्या विद्यार्थ्याचे इतर सामान्य विद्यार्थ्याच्या बरोबरीने प्रत्येक घटकांमध्ये मूल्यमापन / मूल्यांकन न करता त्यांच्या अध्ययन शैलीनूसार ज्ञानाच्या , भाषेच्या / विषयावर अनुकूलित अध्यापन मूल्यमापनाच्या पद्धती उपयोगात आणणे अपेक्षित आहे . प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर ( इयत्ता 1 ली ते 8 वी )पर्यंतच्या विद्यार्थ्याच्या शाळांमधील सर्व प्रकारच्या परीक्षांचे / मूल्यांकनासाठी, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता ( 9 वी ते 12 वी ) पर्यंतच्या परीक्षा पद्धतीमध्ये अनुकूलित मूल्यमापन / मूल्यांकन पद्धतीचा उपयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहे . त्यासाठी अध्ययन शैलीनूसार अनुषंगिक व्यवस्था व शैक्षणिक सवलतींचा उपयोगास देखील मान्यता देण्यात आली आहे .
· दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी खालील सर्व प्रकारच्या परीक्षांचे / मूल्यांकनासाठी खालील सोयी सवलती देण्यात आलेल्या आहेत .
· विद्यार्थ्याच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील ( विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत , ती शाळा किंवा घराजवळ ची शाळा ).
· या विद्यार्थ्याना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास 20 मिनिटे अधिक देय राहील .
· अनुतीर्ण होणार्या विद्यार्थ्याना कमाल 20 गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयामध्ये विभागून देण्यात यावी .
· वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी .
· शालेय स्तरावर इयत्ता 1 ली ते 9 वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता 10 वी ते 12 वी परीक्षेत प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्याना गणित सर्व शाखा , पुस्तक पालन लेखाकर्म , भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र या विषयांसाठी आवाजाच्या गणकयंत्राचा Calculator ( Talking Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर Calculator वापरता येईल. ( शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते )
· अंशत: अंध विद्यार्थ्यासाठी मोठ्या अक्षरातील ( Arial 20 Size) प्रश्नपत्रिका छ्पण्यात यावी .
· विज्ञान व तंत्रज्ञान ( पेपर 1 व 2 ) या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेएवजी या विद्यार्थ्याना या विषयाची तोंडी परीक्षा देता येईल . तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत .
· परीक्षा कालावधीमध्ये गणितीय पाटीचा (Trailer Frame) वापर करता येईल .
· अंशत: अंध विद्यार्थ्याना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी स्केच पेनचा व प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी Glass Magnifier चा वापर करता येईल .
· परीक्षेच्या वेळी गरजेनुसार abacus व भूमितीय साहित्य साधनांचा वापर करता येईल
· आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील. याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील .
· जर एखाद्या विद्यार्थ्याला संगणकाद्वारे परीक्षा द्यावयाची असल्यास स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर असलेल्या संगणक NVDA Software / Super Nova तसेच वेळोवेळी अद्यावत ICT तंत्राचा वापर करता येईल. परंतु, त्यासाठी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. ( शाळेने याबाबतचा पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे )
· महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम ,1977 मधील विनयिम क्र . 99 व विनियम क्र . 52 नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व 6 विषय घेऊन प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यानाच देय राहील .
· मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्न पत्रिकेत करण्यात यावे . (इयत्ता 1 ली ते 9 वी साठी)
सदर शासन निर्णय खालील लिंक वर उपलब्ध असून अधिक महितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून सदर शासन निर्णय download करू शकता .
ज्या ज्या दिव्यांग बालकांना शिक्षणात आव्हाने येतात , त्यांची आव्हाने कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी मानवी अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तींमध्ये सार्वत्रिक मानवता भाव निर्माण करणे व सर्व मुले शिकू शकतात, ही भावना दृढ करण्याची आवश्यकता आहे .
दृष्टिदोष असणारे बहुतांश विद्यार्थी मंददृष्टीचे असतात . मंददृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध Optical साधने व मोठ्या टाईपची अक्षरे असणारी पुस्तके , भिंगे यांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे . ‘ अंध ‘ असे गणले जाणाऱ्या काही बालकांनाही काही प्रमाणात दृष्टी असू शकते . अंधत्व असणारी व्यक्ती ‘ब्रेल ‘ च्या माध्यमातून लिहू व वाचू शकते .
Comments